रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची हत्या

डोंगरगडवरुन गोंदियाला ट्रेननं प्रवास करणा-या एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडकीस आलीय. सुरज जैन असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 

Updated: Aug 18, 2017, 07:35 PM IST
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची हत्या  title=

गोंदिया : डोंगरगडवरुन गोंदियाला ट्रेननं प्रवास करणा-या एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडकीस आलीय. सुरज जैन असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 

मृत सुरज जैन या 68 वर्षीय महिला नातेवाईकांकडे काही कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. गोंदियाला परतीच्या वेळी झारसुकडा ते गोंदिया येणा-या ट्रेनमधील जनरल डब्ब्यात त्या प्रवास करत होत्या. 

आमगावला येत असताना जनरल डब्बा रिकामा झाला. आणि त्याचवेळेस त्या डब्ब्यात एक अनोळखी व्यक्ती मद्यपान करुन डब्यात शिरला. गोंदिया स्टेशन गाठले असता सुरज जय या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह सीटखाली आढळला. पोलीस या आरोपीचा शोध घेतायत.