मैत्रिणीशी ओळख करून दिली नाही म्हणून मारहाण

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Jul 9, 2017, 09:46 PM IST
मैत्रिणीशी ओळख करून दिली नाही म्हणून मारहाण  title=

पुणे : हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर मैत्रिणीची ओळख करून न दिल्यामुळे तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आलीय. प्रणव दातार, अमोघ रानडे, गुरूबिरसिंग लांबा अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

पार्थ व्यास हा मित्र शंतनू राय आणि त्याच्या दोन मैत्रिणींसह बुधवारी रात्री मुंढवा परिसरातील लोकल गॅस्ट्रो बार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होता. तेव्हा आरोपीही तिथे आले होते. त्यावेळी प्रणव दातार तिथे आला आणि तुझ्या मैत्रिणीसोबत ओळख करून दे तुला दारू पाजतो, असं सांगितलं. मात्र त्याला नकार दिल्यामुळे राग आल्याने त्याने हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर पार्थला आणि त्याच्या सहकारी असलेल्या मैत्रिणींना मारहाण केली.