Maharashtra News

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या गाडीला अपघात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुण्यात अपघात झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. किवळेफाटा हायवेवर रस्त्याच्या मध्ये तवेरा गाडी उभीर होती. आठवलेच्या गाडीच्या चालकाला सुरुवातीला ते लक्षात आले नाही पण ही गोष्ट लक्षात येताच चालकाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे आठवले यांच्या गाडीमागे असणारी पोलीस गाडी त्यांच्या गाडीला धडकली. 

सदाभाऊंनी सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना केलं पुन्हा टार्गेट

सदाभाऊंनी सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना केलं पुन्हा टार्गेट

सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा सुकाणू समितीमधील शेतकरी नेत्यांना टार्गेट केलं आहे. माझ्यावर शेतकरी आंदोलन फोडल्याचा आरोप करणारे शेतकरी नेते त्या रात्रीपर्यंत होते कुठे ? शेतकरी आंदोलन चिघळण्या मागे शेतकरी नेतेच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांना आंदोलनात यश मिळाल्या नंतर झोपलेले शेतकरी नेते जागे झाले आणि आपली किंमत शून्य होणार म्हणून या नेत्यांनी महाराष्ट्र पेटवला. 

आज पक्ष बैठकीत सदाभाऊंची हक्कालपट्टी होण्याची शक्यता

आज पक्ष बैठकीत सदाभाऊंची हक्कालपट्टी होण्याची शक्यता

स्वाभिमानाची शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक होते आहे. या बैठकीचं निमंत्रण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देण्यात आलेलं नाही. या बैठकीत सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

अनैतिक संबंधातून पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये कराची चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.

डोंबिवलीमध्ये सुरु होणार पासपोर्ट सेवा केंद्र

डोंबिवलीमध्ये सुरु होणार पासपोर्ट सेवा केंद्र

पासपोर्ट मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत जायला लागणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

नागपुरातही पेट्रोल पंपांवर ग्राहकांची लूट उघडकीस

 ठाणे क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने नागपुरातही पेट्रोल पंपांवर चालणारी ग्राहकांची लूट उघडकीस आणली आहे.

नागपुरात बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट, दोघांना अटक

बेरोजगार युवकांची फसवणूक करणारं मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. 

 नेवाळी जाळपोळ प्रकरणी २५ जणांना अटक

नेवाळी जाळपोळ प्रकरणी २५ जणांना अटक

 कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी मानपाडा पोलीसांनी 25 जणांना अटक केलीय. या सर्वांवर  जाळपोळ,दंगल माजवण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

हिरोईन बनवण्याचं आमिष दाखवून तरुणींना गंडा

चित्रपटातील नायिकेची मुख्य भूमिका देण्याचे आमीष दाखवून हर्ष सपकाळे या भामट्याने नाशिकमधील नवोदित अभिनेत्रीच्या पित्याला साडे नऊ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या आरोपीविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून एकवीस वर्षीय तरुणांचा हा उद्योग शिक्षण क्षेत्रात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

नेवाळीच्या २५ आंदोलनकर्त्यांना अटक

नेवाळीच्या २५ आंदोलनकर्त्यांना अटक

कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी मानपाडा पोलीसांनी २५ जणांना अटक केलीय. 

बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मंगेशला वाचवण्यासाठी यंत्रणेला अपयश आलंय. तब्बल ११ तास मंगेशला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू होते. 

संघर्षाला हवी साथ : अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन

संघर्षाला हवी साथ : अपंगत्व, गरीबीवर करणारा हुसेन

लहानपणापासून आलेलं अपंगत्व, त्यात घरची गरीब परिस्थिती... तरीही ठाण्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या मोहम्मद हुसैननं दहावीला ९० टक्के गुण मिळवलेत. महापालिकेच्या ऊर्दू शाळेत शिकणारा मोहम्मद काबाडकष्ट करून शिकला. मात्र यापुढं त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गरज आहे ती मदतीच्या हातांची...

इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण

इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण आज इंदापूर इथे पार पडत आहे. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ झाली असून थोड्याच वेळात या रिंगण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तर हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी इथे मोठी गर्दी केली आहे.

भर पावसात अचानक गाडीनं घेतला पेट आणि...

भर पावसात अचानक गाडीनं घेतला पेट आणि...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगन-आर कार भीषण आग लाग न जळून खाक झाल्याची घटना घडलीय.

पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. पहिने गावात ही घटना घडलीये.

जळगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची करुण कहाणी

जळगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची करुण कहाणी

निसर्गाचा लहरीपणा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमती तसेच शेतीमालाचे पडलेले दर या सगळ्या अडचणीतून राज्यातील शेतकरी जात आहे. 

ताम्हाणी घाटात अडकलेल्या ५० पर्यटकांची सुखरूप सुटका

रायगडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५० पर्यटकांचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्यानं त्या सर्वांना सुखरुप वाचवण्यात आलं. 

पनवेलजवळच्या गाढेश्वर नदीत बुडून नवी मुंबईतल्या दोघांचा मृत्यू

पनवेलजवळच्या गाढेश्वर नदीत बुडून नवी मुंबईतल्या दोघांचा मृत्यू

पनवेल जवळच्या गाढेश्वर नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा

पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. 

दमदार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो

दमदार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो

पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना आठवण होते ती लोणावळ्याच्या भूशी डॅमची. भूशी डॅम भरून वाहू लागलाय. लोणावळा शहरात शनिवारी आणि रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भूशी डॅम भरभरून वाहू लागलाय. 

वळू सिनेमाचा नायक डुरक्याची एक्झिट

वळू सिनेमाचा नायक डुरक्याची एक्झिट

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली.