सत्ताधाऱ्यांनी संकुचित विचाराने वागता कामा नये- शरद पवार

देशात मर्यादित विचार येतो आहे की काय?

Updated: Sep 2, 2018, 07:53 PM IST
सत्ताधाऱ्यांनी संकुचित विचाराने वागता कामा नये- शरद पवार

धुळे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्धघाटन प्रसंगी पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. 

देशात मर्यादित विचार येतो आहे की काय?, असा प्रश्न पवारांनी यावेळी उपस्थित केला. भारतासारख्या खंडप्राय देशात सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन पुढे नेले पाहिजे. तरच सर्व घटकांचा देशाच्या विकासात उपयोग करत येईल, असे पवार यांनी यावेळी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी संकुचित विचाराने वागता कामा नये, असा सल्लाही पवारांनी दिला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close