माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं- पंकजा मुंडे

मी तुमचा आक्रोश मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवेन. 

Updated: Jul 26, 2018, 08:35 PM IST
माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं- पंकजा मुंडे title=

बीड: मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर असती तर मी विलंब न लावता त्यांना आरक्षण दिले असते, असे वक्तव्य ग्रामविकस मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, आंदोलनात जीव गमावू नका. माझ्या वाघांनो जीव देऊ नका, आमचा जीव घ्या.  मी तुमचा आक्रोश मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवेन. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते की, जर माझ्या टेबलावर आरक्षणाची फाईल असती, तर मी क्षणाचा विलंब न करता आरक्षण दिले असते. 

तसेच आंदोलनात चूक नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर यासंबंधी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करु, असे आश्वासनही पंकजा यांनी दिले. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत आंदोलनाच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात येईल.