Marathwada News

लवकरच सुरु होणार नांदेड-मुंबई रेल्वे

लवकरच सुरु होणार नांदेड-मुंबई रेल्वे

प्रवाशांच्या मागणीमुळे लवकरच नांदेड - मुंबई नवीन रेल्वे सुरु होणार आहे. तर नांदेड नागपूर ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला तर ती दररोज चालवण्यात येणार आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व्ही.के.यादव यांनी दिली.

जन्मदात्या पित्याने दोन चिमुकल्यांची पेटवून केली हत्या

  हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यातील टालेवाडीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोघा मुलांची पेटवून हत्या केली. या क्रुरकर्म्याचे नाव कुंदन वानखेडे आहे. कुंदनचे पत्नीशी गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरु होते. यातून हे कृत्य केले.

लातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस

लातूर, निलंगामध्ये दमदार पाऊस

लातूर, निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला. 

औरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त

औरंगाबादेत वादळी पाऊस, डाळिंब - मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त

औरंगबादच्या पैठण तालुक्यात थेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे ५०  घरांचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे  डाळिंब आणि मोसंबीच्या बागा त्यामुळं उद्धवस्त झाल्यात. 

अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबाकडून चक्क शेण खाऊ घातले

अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबाकडून चक्क शेण खाऊ घातले

लातूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आलीये. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे... 

शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध

शरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध

मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय.

बीडमध्ये खासगी बसच्या अपघातात ९ ठार

बीडमध्ये खासगी बसच्या अपघातात ९ ठार

बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसचा अपघात होऊन नऊ जणांचा मृत्यू झालाय. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

पर्यावरणपूरक लग्नाची पत्रिका

पर्यावरणपूरक लग्नाची पत्रिका

लग्नाची पत्रिका केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी जमिनीत पुरली तर... आणि मग त्यातून तुळस किंवा निलगिरीचं झाड उगवलं तर... तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे... पण थांबा आधी औरंगाबादच्या नागेश आणि अनघाच्या लग्नाची पत्रिका पहा... म्हणजे तुमचं मत नक्कीच बदलेल...

२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने. 

 मराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण

मराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण

महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.

मराठवाड्यात संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक

मराठवाड्यात संपाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी आक्रमक

संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार उठविण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे माहुर तालुक्यातील धानोडा फाटा येथे शिवामृताची गाडी अडवून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. 

शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण

शेतकरी संपाला औरंगाबादमध्ये हिंसक वळण

शेतकरी संपाला आज सकाळी औरंगाबादमध्ये हिंसक वळण लागलं. औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्त्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते. त्याच दरम्यान एका ट्रकची हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला. यात जयाजीराव सूर्यवंशीसह ५ शेतकऱ्यांना मारहाण केली.

सनीच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की

सनीच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन बुधवारी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित झाली होती. तिच्या कार्यक्रमात पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यानं हा कार्यक्रम वादात सापडला.

लातूरमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम, पत्रकारांना धक्काबुक्की

लातूरमध्ये सनी लिओनीचा कार्यक्रम, पत्रकारांना धक्काबुक्की

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री तथा पॉर्न स्टार सनी लिओनी लातूरमध्ये एका जिमच्या उद्घाटनासाठी आली होती. 

ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने केले लंपास

ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने केले लंपास

नांदेडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडलीय. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय. 

औरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

औरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

 सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 

औरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव

औरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव

बोर्डानं बारावीच्या ४७१  विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.  

संवाद यात्रेत भाजप आमदार शेकऱ्यांवरच भडकले

संवाद यात्रेत भाजप आमदार शेकऱ्यांवरच भडकले

ही धक्कादायक बातमी औरंगाबादमधून आहे. सरकारची शिवार संवाद यात्रा सुरु आहे, या यात्रेदरम्यान औरंगाबादचे भाजपचे आमदार अतुल सावे शेतकऱ्यांवरच भडकले. 

व्हिडिओ: मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस पळून गेल्याची चर्चा खोटी

व्हिडिओ: मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पोलीस पळून गेल्याची चर्चा खोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हॅलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर पोलीस तेथून पळून गेले अशी चर्चा सुरु होती.

हेलिकॉप्टर दुर्घटना : CM सुखरुप बाहेर पडतानाचा व्हिडिओ हाती

हेलिकॉप्टर दुर्घटना : CM सुखरुप बाहेर पडतानाचा व्हिडिओ हाती

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. मात्र, मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर पडतानाचा नवा व्हिडिओ हाती लागला आहे.

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड

औरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड

 गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे.  महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.