सागरिका घाटके 'डाव' मधून प्रेक्षकांच्या भेटीला

By Pravin Dabholkar | Last Updated: Saturday, August 12, 2017 - 18:16
सागरिका घाटके 'डाव' मधून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :  प्रेमाची गोष्ट मधून प्रेक्षकांच्या मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस ती 'डाव' या सिनेमात सर्वांना दिसणार आहे.  ‘चक दे इंडिया' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे तिने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. 

 हिंदीसोबतच मराठीतही अभिनयाची छाप टाकणारी  सागरिका ‘डाव’ या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर ‘डाव’ हा सागरिकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे. माजी क्रिकेटपट्टू झहीर खान याच्याशी साखरपुडा झाल्यावर ती काही दिवसांपुर्वी चर्चेत आली होती.  नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डाव’ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रीलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. सागरिका यामध्ये मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. यामध्ये ती नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची भुमिका करताना दिसणार आहे. त्यामुळे सर्वांना तिच्या अभिनयाविषयी उत्सुकता लागून राहीली आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण अद्याप याची निश्चित तारीख सांगण्यात आली नाही.
 
 योगेश मार्कंडे यांनी 'डाव' सिनेमाचे  संवाद लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे.   इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘डाव’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिका हिने सांगितले. 

First Published: Saturday, August 12, 2017 - 18:16
comments powered by Disqus