दिवाळीत रोषणाईनं उजळून निघालंय 'हे' शहर!

एका शहराचं गेल्या काही महिन्यात रुपच पालटलंय. 

Updated: Oct 18, 2017, 11:43 PM IST
 दिवाळीत रोषणाईनं उजळून निघालंय 'हे' शहर! title=

कपिल राऊत, झी मीडिया

 ठाणे : एका शहराचं गेल्या काही महिन्यात रुपच पालटलंय. दिवाळीत तर हे शहर रोषणाईनं उजळून निघालंय. स्मार्ट सिटी होण्यासाठी या शहराचे प्रयत्न निश्चितच सुखावणारे आहेत. पाहुया कुठलं आहे हे शहर आणि कसं उजळलंय त्याचं रुप...

दिवाळीच्या रंगात उजळलेलं हे ठाणं..... रंगीबेरंगी ठाण्याची ही वाटचाल आहे स्मार्ट सिटी होण्याची. ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त होण्यासाठी ठाणे महापालिकेचे ११० अभियंते दिवाळीच्या आधी दिवसरात्र काम करत होते. रस्ते धुतले, बागा धुतल्या, खड्डे बुजवले, भिंती रंगवल्या, तलावही स्वच्छ केले. आणि चकाचक झालेलं ठाणं दिवाळीच्या रोषणाईनं आणखी उजळून निघालं. 

ही सगळी कल्पना ठाण्याचे आयुक्ती संजीव जयस्वाल यांची. विशेष म्हणजे ही सगळी कामं ठेकेदार, विकासक आणि हॉटेलमालकांकडून करुन घेण्यात आली. त्यामुळे या कामांचा कुठलाच बोजा महापालिकेवर पडला नाही. 
स्मार्ट सिटी होणा-या ब्रँड ठाणेची ही झलक आहे. सध्या रोषणाईनं उजळून निघालेलं ठाणं भविष्यात विकासानंही उजळून निघेल, अशी आशा आहे. पण आयुक्तांच्या या प्रयत्नांनी ठाण्याला नव'संजीवनी' निश्चितच मिळाली आहे.