वेशभूषा साकारलेल्या स्पर्धकांची मॅरेथॉन उत्साहात

कुणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती तर मावळ्यांच्या वेशभूषेतही काही स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं. 

Updated: Jan 21, 2018, 01:15 PM IST
 वेशभूषा साकारलेल्या स्पर्धकांची मॅरेथॉन उत्साहात  title=

मुंबई : आशिया खंडातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन असा लौकिक असणा-या मुंबई मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंनी सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळाला.

मराठमोळा अंदाज 

मॅरेथॉनचे खास आकर्षण ठरले ते विविध अंदाजात सहभागी झालेले स्पर्धक. मराठमोळ्या अंदाजात आणि पारंपरिक वेशभूषा करुन स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.

कुणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती तर मावळ्यांच्या वेशभूषेतही काही स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं. 

दिव्यांगांचाही उत्साह 

 मॅरेथॉनमध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी वेगळी स्पर्धा पार पडली. यावेळी या मुलांचा उत्साह कुणालाही थक्क करेल असाच होता. 

ज्येष्ठांचा सहभाग  

'अभी तो हम जवान है' असं म्हणत ज्येष्ठ नागरिकही या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. त्यांचा उत्साह आजच्या तरुणाईला लाजवेल असाच होता.