मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत ९५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुलुंड पाच रस्ता येथे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास, एका अज्ञात होंडा सिटी कारने धडक दिल्याने 95 वर्षीय शांताबाई जोशी यांचा मृत्यू झाला. 

Updated: Jun 22, 2017, 07:23 PM IST
मुलुंडमध्ये वाहनाच्या धडकेत ९५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू title=

मुलुंड : मुलुंड पाच रस्ता येथे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास, एका अज्ञात होंडा सिटी कारने धडक दिल्याने 95 वर्षीय शांताबाई जोशी यांचा मृत्यू झाला. 

शांताबाई यांचे कोणीतेही नातेवाईक नसून त्या एकट्याच या ठिकाणी रहात होत्या. वय झाल्याने त्यांना चालायलाही जमत नव्हतं. परंतु अशा अवस्थेत ही त्या जमेल तशा घराबाहेर पडून रोज सकाळी चहा पिण्यासाठी पाच रस्ता विभागात येत होत्या. 

बुधवारी सकाळीदेखील त्या अशाच प्रकारे चहा पिण्यासाठी आल्या असता, होंडा सिटी कारने त्यांना धडक देऊन पळ काढला. स्थानिकांनी याची माहिती मुलुंड पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी शांताबाईंना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या कार चालकाचा शोध घेत असून, या प्रकरणी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.