आमदार रमेश कदम यांनी केली भाजपमुक्त होण्याची घोषणा...

भाजपात जावून आठ महिने झालेत... कुठलंही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवलंय.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 08:26 PM IST
आमदार रमेश कदम यांनी केली भाजपमुक्त होण्याची घोषणा... title=

मुंबई : भाजपात जावून आठ महिने झालेत... कुठलंही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवलंय. कुठल्याही सभेला, बैठकीला बोलावणं नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर पक्षात राहून तरी काय करणार ? असा सवाल करत पक्ष सदस्य नसल्यानं भाजपमुक्त होत असल्याची घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज केली.

लवकरच कार्यकर्त्यांचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  तसंच कुठल्या पक्षात जाणार आहोत याचा अद्याप विचार केला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावार टीका केली.