मिलिंद एकबोटेंवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला.

Updated: Mar 13, 2018, 03:28 PM IST
मिलिंद एकबोटेंवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मुंबई : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला.

वढू गावातील संभाजी महाराजांची समाधी सरकार ताब्यात घेऊन तिची देखभाल करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

या प्रकरणी आतापर्यंत १६२ आरोपींना अटक करण्यात आलीय. दंगलीत सुमारे ९ कोटी ४५ लाख रूपयांचे नुकसान झाले... तर महाराष्ट्र बंदच्या वेळी सुमारे १३ कोटींचं नुकसान झालं, असंही त्यांनी सांगितलं. 

'महाराष्ट्र बंद' प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. मात्र गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत पुढील तीन महिन्यांत पोलीस समितीकडे अहवाल देतील, असंही मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन करताना सांगितलं.