कोकणात दाखल झाल्यावर मान्सूनच्या प्रगतीला पुन्हा ब्रेक

मान्सून कोकणात दाखल झाल्यावर आता त्याची मुंबईत आतुरतेनं प्रतीक्षा सुरू झालीय. पण ही प्रतीक्षा आणखी काही तास लांबण्याची चिन्हं आहेत. 

Updated: Jun 10, 2017, 09:35 AM IST
कोकणात दाखल झाल्यावर मान्सूनच्या प्रगतीला पुन्हा ब्रेक title=

मुंबई : मान्सून कोकणात दाखल झाल्यावर आता त्याची मुंबईत आतुरतेनं प्रतीक्षा सुरू झालीय. पण ही प्रतीक्षा आणखी काही तास लांबण्याची चिन्हं आहेत. 

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूननं तळकोकणातच तळ ठोकलाय. खरंतरं आज मान्सून मुंबापुरीत दाखलं होणं अपेक्षित आहे. पण अजूनतरी तशी परिस्थिती दिसत नाही. रात्री पूर्व उपनगर आणि नवी मुंबई परिसरात रिमझीम पावसाने हजेरी लावली असली, तरी मान्सूनचा पाऊस दाखल होण्याबद्दल हवामान खात्यानं अधिकृत घोषणा केलेली नाही. 

दरम्यान, कल्याण डोंबिवलीत गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं.  मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली..रात्री 12 च्या सुमारास सुरू झालेला पावसाची सकाळ पर्यंत संतधार सुरू असून पाहिल्या पावसाने कल्याण डोंबिवलीकर चिंब झाले.

या पावसामुळे अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू असल्यानं त्याचा नागरिकाना मनस्ताप सहन करावा लागत आहे..मात्र एकूणच आल्हाददायक वातावरणानं कल्याणकरांच्या विकेंडची सुरुवात झाली..