सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

 9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

Updated: Aug 9, 2017, 01:04 PM IST
 सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार  title=

मुंबई :  9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

57 अन्वये प्रश्नोत्तर तास बाजूला ठेवून, मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षाला सरकार बोलू देत नाहीये. सत्ताधारीच गोंधळ घालत आहेत. आरक्षण निर्णय घ्या, आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.  

दुस-या समाजाच्या आरक्षणला धक्का न लावता आरक्षण दिले गेले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे आमदार मोर्चात गेले त्यांची हुर्यो उडवली.  मोर्चा अतिशय शांततेत सुरु आहे. जगाने याची दखल घेतली आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.