सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, अचडणीत वाढ!

सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलेय.  

Updated: Nov 27, 2018, 10:56 PM IST
सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार, अचडणीत वाढ! title=

मुंबई : सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलेय. तसा दावा एसीबीच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा दावा करण्यात आलाय.

या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. सिंचन गैरव्यवहाराला अजित पवारच जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्र एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलंय. तांत्रिक मंजुरी नसतानाच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवारांनी सिंचनाचे कंत्राट दिल्य़ाचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. 

२७ पानांचं हे प्रतिज्ञापत्रात असून यात अजित पवारांवरच ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे अजित पवारांवर काय कारवाई होणार याबाबत आता चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांवरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहेत. मात्र ही कारवाई सूडबुद्धीनं नसल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 'झी २४ तास'शी फोनवरून बोलताना केलाय.