विक्रोळीतील या शाळातील सर्वच विद्यार्थी नापास

एचएससी बोर्डाच्या निकालात विक्रोळीतील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह

Updated: May 31, 2017, 07:45 PM IST
विक्रोळीतील या शाळातील सर्वच विद्यार्थी नापास title=

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : एचएससी बोर्डाच्या निकालात विक्रोळीतील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह

विक्रोळीच्या टागोरनगर महालक्ष्मी शिक्षण संस्थेचं विद्यामंदिर महाविद्यालय आहे. एचएससीचा निकाल लागल्यापासून या शाळेत मुख्याध्यापक शिक्षण फिरकेलच नाहीत. कारणही तसंच आहे. या महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा देणारे सर्वच्या सर्व १६ विद्यार्थी नापास झालेत. ईव्हीएस एका विषयात सर्व विद्यार्थी नापास झालेत. त्याला महाविद्यालयच कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. 

या महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी फक्त दोन ते तीन प्राध्यापक असल्यामुळे कोणताही अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे हजारो रूपये खर्चून मुलांसाठी खासगी शिकवणी पालकांनी लावली. पण ढिसाळ व्यवस्थापनाने मुलांचं भवितव्य दावणीला लागल्याचा आरोप पालकांचा आहे. 

यासंदर्भात शाळेची बाजू ऐकण्यासाठी झी २४ तासच्या प्रतिनिधीने विद्यामंदिर गाठलं. पण तिथे शाळेचा कोणताही अधिकारी बाजू मांडण्यासाठी पुढे आला नाही. विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आहे. पालकही हतबल झालेत. महाविद्यालय प्रशासन ढिम्मं आहे. आता शिक्षण खातं या परिस्थितीत काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.