ATM मध्ये पैशांची कमतरता भासणार, तीन दिवस बँका बंद

तुमच्याकडे खर्चासाठी पैसे नसतील तर आताच तुम्ही पैसे एटीएमधून काढून ठेवा, नाही तर पैशाची चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 23, 2017, 09:04 PM IST
ATM मध्ये पैशांची कमतरता भासणार, तीन दिवस बँका बंद   title=

नवी दिल्ली : तुमच्याकडे खर्चासाठी पैसे नसतील तर आताच तुम्ही पैसे एटीएमधून काढून ठेवा, नाही तर पैशाची चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.

उद्या चौथा शनिवार त्यानंतर रविवार आणि सोमवारी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे या तीन दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे पैशासाठी एटीएमवर भर राहिल. त्यामुळे एटीएमवर पैशासाठी रांगा दिसून शकतात.

तुमच्याकडे खर्चासाठी पैसे नसतील तर तुम्हाला तीन दिवस खर्च भागविणे कठीण होईल. तसेट नेट बॅंकिंस सेवेवरही परिमाम होऊ शकतो. त्यामुळे पैशाच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो.