मुंबईत बेस्ट बस आणि एसटी बसची धडक

मुंबईतल्या धारावीत शुक्रवारी रात्री बेस्ट बस आणि एसटी बसची धडक झाली. 

Updated: Aug 12, 2017, 12:46 PM IST
 मुंबईत बेस्ट बस आणि एसटी बसची धडक title=

मुंबई : मुंबईतल्या धारावीत शुक्रवारी रात्री बेस्ट बस आणि एसटी बसची धडक झाली. या धडकेत बेस्ट बस चालक आणि कंडक्टर जखमी झालेत. 

एसटी बस बोरीवलीहून दापोलीकडे जात होती. त्यावेळी एसटीच्या पुढे असणा-या रिक्षा चालकानं अचानक उजव्या बाजूला वळण घेतलं. त्यामुळे एसटी चालकाला जोरदार ब्रेक लावावा लागला. त्याचवेळी मागून वेगाने येणा-या बेस्ट बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि जोरात एसटीवरुन जाऊन धडकली. 

या धडकेत बेस्ट बस चालक आणि कंडक्टर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आलंय. या दुर्घटनेत एसटीमधील सर्व 33 प्रवासी सुखरुप आहेत.