नवोदित अभिनेत्रीचा मृतदेह मुंबईच्या घरात सापडला

 भोजपुरी चित्रपटात भूमिका करणारी नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिचा मृतदेह तिच्या अंधेरी पश्चिम येथील घरात सोमवारी सकाळी छताला लटकलेला आढळला. 

प्रशांत जाधव | Updated: Jun 19, 2017, 04:53 PM IST
 नवोदित अभिनेत्रीचा मृतदेह मुंबईच्या घरात सापडला

मुंबई :  भोजपुरी चित्रपटात भूमिका करणारी नवोदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिचा मृतदेह तिच्या अंधेरी पश्चिम येथील घरात सोमवारी सकाळी छताला लटकलेला आढळला. 

या संदर्भात डीएन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजलीचे नातेवाईक तिला रविवारपासून फोन करण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्यांच्या फोनला तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी मग तिच्या घरमालकाला सूचीत केले. 

घरमालकाने पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करून सूचित केले.  अंजली ही अंधेरीच्या जुहू लेन येथील परिमल सोसायटीत राहत होती. पोलिसांनीया ठिकाणाहून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही.  तिने असा प्रकार का केला असावा याचा तपास पोलिस करीत आहे, असे मुंबई पोलिस प्रवक्त्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितले.