भोसरी जमीन प्रकरण, खडसेंच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल 'झी २४तास'च्या हाती

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल झी २४ तासच्या हाती  लागलाय. एसीबीने खडेसेंना क्लीनचिट दिली असली तरी हा अहवाल विसंगतीने भरलाय.

Updated: May 16, 2018, 10:59 PM IST
भोसरी जमीन प्रकरण, खडसेंच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल 'झी २४तास'च्या हाती

मुंबई : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल झी २४ तासच्या हाती  लागलाय. एसीबीने खडेसेंना क्लीनचिट दिली असली तरी हा अहवाल विसंगतीने भरलाय.

एकीकडे खडसेंना क्लीनचिट तर दुसरीकडे ही जमीन सरकारचीच असल्याचंही एसीबीने म्हटलंय. जमीन खरेदीचा व्यवहार संशयास्पद नाही असं म्हणतानाच खडसे कुटुंबीयांचं हीत लक्षात घेऊन जमिनीचा मोबदला देण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती असा संशयही एसीबीने व्यक्त केलाय.

आयकर नियमांचे उल्लंघन, जमिनीचा कमी मोबदला, जमीन खरेदीसाठी खाजगी कंपनीकडून विनातारण मिळालेलं कोट्यवधींचं कर्ज... असे अनेक मुद्दे या अहवालातून समोर आले आहेत.