भाजपचे ४५ आमदार पुढची निवडणूक हरण्याची शक्यता; गोपनीय सर्वेक्षणाचा अहवाल

हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना देण्यात आला.

Updated: Oct 11, 2018, 03:29 PM IST
भाजपचे ४५ आमदार पुढची निवडणूक हरण्याची शक्यता; गोपनीय सर्वेक्षणाचा अहवाल

मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल, असा अहवाल समोर आला आहे. भाजपाच्या ४० टक्के म्हणजे ४५ आमदारांची चार वर्षातील कामगिरी खराब असून त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी भाजप सरकारने दिल्लीतील 'चाणक्य' या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या  तयारीसाठी प्रदेश भाजपने ही बैठक बोलावली होती.

या बैठकीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल भाजपाच्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीत प्रत्येकाला बंद लिफाफ्यात देण्यात आला. हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना देण्यात आला. चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात ४५ आमदार आणि ६ खासदारांचे पुढच्या निवडणुकीतलं भवितव्य धोक्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close