लालबागचा राजा मंडळाला ४.८६ लाखांंचा दंड

मोठ्या धामधूमीमध्ये मुंबईत गणेशोत्सव पार पडला.

Updated: Sep 14, 2017, 12:31 PM IST
लालबागचा राजा मंडळाला  ४.८६ लाखांंचा दंड

मुंबई : मोठ्या धामधूमीमध्ये मुंबईत गणेशोत्सव पार पडला.

यंदा १२ दिवसांनंतर गणपतीचे विसर्जन झाले. पण या दिवसांमध्ये रस्स्त्यावर खड्डे खोदल्याप्रकारणी लालबागच्या आणि गणेशगल्लीच्या मंडळांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

लालबागचा राजा मंडळाने २४३ खड्डे तर गणेशगल्ली मंडळाने २०७ खड्डे खणल्याबद्दल त्यांच्यावर प्रत्येकी  चार लाख ८६ हजार आणि चार लाख १४ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खोदलेले खड्डे न बुजवल्याने पालिकेने या मंडळांना नोटिसा देखील पाठवल्या आहेत.

मुंबईकर आधीच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हैराण आहेत. यामध्ये सार्वजनिक उत्सवाच्या काळात मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदून  त्यामध्ये अधिकच भर केली जाते. त्यामुळेच एफ दक्षिण विभागाच्या वतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.