मुंबई महापालिका घनकचरा विभागातील घोटाळ्याची चौकशी होणार

मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील घोटाळा 'झी २४ तास'ने उघडकीस आणल्यानंतर आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 

Updated: Mar 16, 2018, 12:25 AM IST
मुंबई महापालिका घनकचरा विभागातील घोटाळ्याची चौकशी होणार title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील घोटाळा 'झी २४ तास'ने उघडकीस आणल्यानंतर आता या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 

नालेसफाई घोटाळ्यातील तसंच कच-यात डेब्रिजची भेसळ करून पालिकेची फसवणूक करणा-या घोटाळेबाज कंत्राटदारांनाच पुन्हा कामे दिली जात असल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. 

कच-यात डेब्रिजची भेसळ करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी सप्टेंबर २०१७ मध्ये ८ वाहतूक कंत्राटदारांविरोधात विक्रोळी आणि कुर्ला पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे अस्लम शेख यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सांगितले. 

कच-यात डेब्रिज भेसळ करणा-या पाच कंत्राटदाराचे प्रस्ताव मागील आठवड्याच्या स्थायी समितीत रेकॉर्ड केले असतानाच दुसरीकडं डेब्रिज भेसळ करणा-या पीडब्लूजी कंपनीस कचरा वाहतुकीचे काम पु्न्हा दिले गेले आहे. तसंच आता एमके एण्टरप्राईजेस कंपनीस के वॉर्डमधील काम देण्याचा घाट घातला जात आहे.