डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Updated: Nov 30, 2017, 11:06 AM IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

मेन लाईनवर दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द, वाशी, पनवेल स्थानकांदरम्यान या विशेष ट्रेन धावणार आहेत. 

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर डाऊन दिशेला दादर ठाणे विशेष लोकल मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी, दादर कल्याण विशेष लोकल मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांनी आणि दादर-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३ वाजता चालविण्यात येणार आहे.