मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.

Updated: Aug 30, 2017, 08:34 AM IST
मध्य रेल्वे सुरु, दोन लोकल कल्याणच्या दिशेने रवाना title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली रेल्वे कल्याणकडे रवाना झाली. दरम्यान भायकळा येथे लोकल १० मिनिटे रखडली होती. ती आता पुढे रवाना झालेय. त्यानंतर दुसरी लोकलही सोडण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वे आता हळहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रखडेल्या प्रवाशांना मोठा दिसाला मिळालाय.

पहिल्या कल्याण लोकलनं कुर्ला ओलांडलंय. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. दुसरी कल्याण लोकल सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी रवाना झालीय. मध्ये रेल्वे सुरु झाली तरी हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. हार्बरची वाहतूक सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने गाड्या येत आहेत.

शेकडोच्या संख्येने प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रात्रभर खोळंबून होते. लोकल सुरु झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळालाय. सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत वाहतूक सुरु करण्यात यश आलेय. ठाण्याहून बदलापूर आणि टिटवाळ्याकडे वाहतूक सुरु आहे. शिवाय हार्बरची सेवाही पूर्णपणे बंद आहे.

ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर सेवा सुरू त्यामार्गे नवीमुंबईकडे जाणे शक्य आहे.  दरम्यान आज पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू झाली असून धीम्या गतीने काही होईन लोकल सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरळीत सुरू आहे.