छगन भुजबळांनी भावनिक वक्तव्य करत घातलं देवाला साकडं

कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी विधानभवनातून निघाल्यानंतर त्यांनी एक भावनिक वक्तव्य केलं.

Updated: Jul 17, 2017, 04:33 PM IST
छगन भुजबळांनी भावनिक वक्तव्य करत घातलं देवाला साकडं

मुंबई : कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी विधानभवनातून निघाल्यानंतर त्यांनी एक भावनिक वक्तव्य केलं.

छगन भुजबळांनी विधानभवनाच्या पाय-या उतरत असतांना म्हटलं की, मी जिवंत असेपर्यंत माझे निर्दोषत्व सिद्ध व्हावे. 'मी त्याआधीच मरण पावलो तर मी दोषी आहे असे लोक समजतील. म्हणून ईश्वराला विनंती आहे की मी माझे निर्दोषत्व सिद्ध करेपर्यंत मला जिवंत ठेव.'

छगन भुजबळ गेल्या १६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. भुजबळ यांना भारतीय दंडविधान १९/१ काळापैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. दरम्यान
त्यांचे अनेक जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावले आहेत.