भुजबळांच्या शेरोशायरीतून सुडाच्या राजकारणाचे संकेत?

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे.

Updated: Jun 13, 2018, 05:50 PM IST

मुंबई : दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवल्यानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. आपल्याला जो टप्प्याटप्प्यानं त्रास देण्यात आला, त्याचा सव्याज बदला घेईन असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.

'जो दर्द तुम हमे किश्तो किश्तो मे दोगे वो आलम क्या होगा जब हम उसे ब्याज के साथ अदा करेंगे', असा शेर भुजबळांनी सादर केला. झी २४ तासच्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुलाखत ठरलीये. यावेळी त्यांनी आपल्याला झालेल्या त्रासाची परतफेड करणार असल्याचं ठणकावलं.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close