चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी

आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 4, 2018, 05:15 PM IST
चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी title=

मुंबई : आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले आहे. ICICIच्या सीईओपदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच बॅंक व्यवस्थापनाने त्यांची अंतर्गत चौकशी सुरु केली होती. कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बॅंक व्यवस्थापनाने तो स्वीकारला आहे. आता संदीप बक्षी हे ICICIचे नवे एमडी, सीईओ झाले आहेत.

आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांनी राजीनामा दिलाय. गेल्या दोन महिन्यांपासून कोचर यांची चौकशी सुरु आहे. पतीशी संबंधित असणाऱ्या कंपनीला आर्थिक फायदा पोहोचवल्या प्रकरणी कोचर यांच्यावर आरोप आहेत. या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोचर यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या घडामोडीनंतर कोचर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. 

आयसीआयसीआयच्या व्यवस्थापनानं त्यांचा अर्ज मान्य केलाय. त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. संदीप बक्षी यांची कोचर यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलीय. पुढल्या पाच वर्षांकरता बक्षी यांची सीईओ आणि एमडीपदी नियुक्ती करण्यात आलीय. दरम्यान आज सकाळापासून बाजार पडलेला असताना आयसीआयसीआय बँकेचा समभाग मात्र, सहा टक्के वधारलाय.