स्वच्छतादूत आफरोजला मुख्यमंत्री आणि सेनेनेही दिला विश्वास

आफरोज शाह हे वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेचे आद्य कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

Updated: Nov 23, 2017, 10:33 PM IST
स्वच्छतादूत आफरोजला मुख्यमंत्री आणि सेनेनेही दिला विश्वास title=

मुंबई : स्वच्छतादूत आफरोज शाह यांनी सुरू केलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला काही समाजकंटानी ढिगळ पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे हताश झालेल्या आफरोज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आपण पाठिशी ठाम उभे असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आफरजसोबत  सदैव असल्याचे सांगितले. 

स्वच्छता मोहिमेत योगदान 

आफरोज शाह हे वर्सोवा किनारा स्वच्छता मोहिमेचे आद्य कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेत यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. 

पंतप्रधानांनी केले कौतूक

आफरोज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम गेल्या ११० आठवड्यांपासून वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबवित आहे.  त्यांच्या या कामाचा गौरव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केला आहे. 

बांबूनी मारण्याचा प्रयत्न

आफरोज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चार आठवड्यांपासून परिसरातील गुंड, गुर्दुल्ले यांच्याकडून शिवीगाळ करण्यात आली.

तसेच बांबूनी मारण्याचा प्रयत्न करत विरोध करण्यात आला. स्वच्छतेच्या या मोहिमेत आफरोज यांच्यासोबत अनेक पर्यावरणप्रेमी जोडले गेले आहेत. 

आदित्य ठाकरेंनी दिला शब्द 

दरम्यान शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्तेही वेळ प्रसंगी तुमच्या पाठिशी उभे राहतील, तुम्ही मोहिम थांबवू नका असा विश्वास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

आदित्य यांनी आफरोज आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घडवून आणलीय या भेटीत पालिकेचेही संपूर्ण सहकार्य असणार असल्याचा दावा महापौरांनी केला.