मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा अखेर हिरवा कंदील

  गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला मुंबईचा विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 

Updated: Apr 25, 2018, 07:33 AM IST
मुंबई विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांचा अखेर हिरवा कंदील  title=

मुंबई :  गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला मुंबईचा विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.खरं तर मुंबई पालिकेतर्फे या विकास आराखड्याला केव्हाच मंजुरी देण्यात आली होती आणि अंतिम मंजुरीसाठी हा विकास आराखडा राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. शिवसेनेची नाराजी लक्षात घेता अचूक वेळ साधत मुंबई विकास आराखड्याला मंजुरी देत एकप्रकारे शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री यांनी केला आहे.

२०१५ ला अनेक त्रुटी आणि वाद निर्माण झाल्याने मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द करत पुन्हा नव्याने तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. आता नव्याने परवानगी देण्यात आलेला विकास हा २०३४ पर्यंत लागू असणार आहे. 

मोकळ्या जमिनींना हात न लावण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे. तसंच स्थानिक मुंबईकर असलेल्या कोळीवाड्याच्या पुनर्विकास करण्यासाठी वेगळा विकास आराखडा ठेवण्यात येणार आहे.