मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबईत कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री होऊ शकते, हे खरं असलं तरी मुंबईत चक्क लहान मुलांच्या खरेदी - विक्रीचा धंदा होत असल्याचं उघड झालंय. 

Updated: Sep 26, 2017, 06:01 PM IST
मुंबईत चिमुरड्यांच्या खरेदी - विक्रीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री होऊ शकते, हे खरं असलं तरी मुंबईत चक्क लहान मुलांच्या खरेदी - विक्रीचा धंदा होत असल्याचं उघड झालंय. 

हा व्यवसाय एक उच्च शिक्षित महिला करत असल्याचं उघड झालंय. वडाळा ट्रक टर्मिनल इथून पोलिसांनी सापळा रचून ज्युलिया फर्नांडीस नावाच्या महिलेला अटक केलीय.

ज्युलिया बाळांची गरज असलेल्यांना हेरायची... त्यानंतर कमी पैशांत मुलं खरेदी करून जास्त पैशात मुलं विकण्याचा धंदा ती करत होती.

वडाळा इथल्या चिखलवाडी इथून एका सात दिवसाच्या बाळाची खरेदी ज्युलियाने केली होती. त्याची विक्री करण्याच्या तयारीत ती असतानाच पोलिसांच्या ताब्यात सापडली.

या बाळाची सुटका करून पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलं आहे. या प्रकरणात आणखी किती जण सामील आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.