मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री

मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Updated: Nov 30, 2017, 11:36 AM IST
मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री title=

मुंबई : मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

हिंदी विचार प्रचार समितीतर्फे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये तयार करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी श्री आय. डी. सिंह चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार नसीम खान, राम कदम, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह इत्यादी नेतेमंडळी उपस्थित होती. 

सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीयांना टार्गेट करत आहेत. मात्र मुख्यमंत्री सक्षम असल्याने त्यांच्यावर कारवाई होतेय असं गुणगाण यावेळी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी गायलं.