राम कदमांची जीभ कापून आणणाऱ्याला 5 लाखाचं बक्षिस

कुणी केलं हे वक्तव्य 

राम कदमांची जीभ कापून आणणाऱ्याला 5 लाखाचं बक्षिस title=

मुंबई : दहीहंडी उत्सवादरम्यान विवादित वक्तव्य केल्यामुळे भाजप नेता राम कदम यांच्यावर चहुबाजूंनी टिका होत आहे. आता काँग्रेस नेत्यांनी देखील राम कदम यांच्यावर टिका करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि महाराष्ट्राचे पूर्व राज्यमंत्री सुबोध सावजीने भाजप नेते राम कदम यांची जीभ कापून घेऊन येणाऱ्या व्यक्तीला 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. सावजी पुढे म्हणाले की, राम कदम यांनी असं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणारं आहे. 

सावजी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र स्त्रियांना आईप्रमाणे समजलं जातं. महाराष्ट्रात जन्मलेले राम कदम मुलींच अपहरण करण्याचं वक्तव्य करत आहेत. आई समान असलेल्या या व्यक्तींसदर्भात असं वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांची चीभ छाटली पाहिजे. 

घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत बेताल वक्तव्य केले. याची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत. महिलांबाबत वक्तव्य करताना आमदार राम कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले होते. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर राम कदम यांनी या प्रकरणात आठ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असेही आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत