'दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करा'

 पुन्हा एकदा दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा 

Updated: Dec 6, 2018, 02:15 PM IST
'दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करा'  title=

मुंबई :  अनेक शहरांची जुनी नाव बदलून त्यांना नवी नाव देण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी तर शहरांची नाव बदलण्याचा सपाटाच लावलाय. महाराष्ट्रातही असे प्रयत्न होताना दिसत आहेत. दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी असं करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या मागणीची अद्याप दखल घेण्यात आली नाहीय.  परिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई आलेल्या आंदोलकांनी पुन्हा एकदा दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा वर आलाय.

आंदोलकांची घोषणाबाजी 

दादर स्थानकावर असलेल्या फलकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस अशा नावाचे स्टीकर्स चिकटवण्यात आलेत. स्टीकर्स चिकटवल्यावर आंदोलकांनी गर्दीत घोषणाबाजीही केली.

आंबेडकरांचा इशारा 

इंदू मिलमधील बाबासाहेबांचे स्मारक बांधणं राज्य सरकारला जमत नसेल तर ते आमच्या ताब्यात द्यावे, आंबेडकरी जनता ते पूर्ण करून दाखवेल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी दिलाय.