मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर

 धनगर समाजाची स्थिती चिंताजनक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Updated: Oct 14, 2018, 10:58 AM IST
मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर title=

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. 'टीआयएसएस'च्या अहवालाच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. 

टीआयएसएसने हा अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. पाच राज्ये, २५ जिल्हे आणि १०० पेक्षा जास्त तालुक्यात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आलाय. धनगर समाजाची स्थिती चिंताजनक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

या अहवालानुसार नवे आरक्षण देणे शक्य होऊ शकते. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कायम ठेवत धनगर आरक्षण देण्याचा पर्याय या अहवालात सुचवण्यात आला आहे.