राज ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट

शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीची चर्चा गुप्त ठेवण्यात आलेय.

Updated: Feb 24, 2018, 05:16 PM IST
राज ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट title=

मुंबई : शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीची चर्चा गुप्त ठेवण्यात आलेय.

सरकारकडून घोर निराशा

प्रकल्पात शेतकऱ्यांची जमीन घेतली गेली होती. यामध्ये धर्मा पाटील या शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र, त्यांना अल्प मोबदला मिळाला होता. त्यामुळे त्यांनी वारंवार मंत्र्यालयात चकरा मारल्या होत्या. मात्र, कोणीही त्यांना दाद दिली नाही. त्यांनी कंटाळून मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे रुग्णालयात निधन झाले.

सरकारकडून अजून मोबादला नाही

दरम्यान, आज धर्मा पाटील यांची चिरंजीव नरेंद्र यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा केली. दरम्यान, आपण सदिच्छा भेट असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

त्याचवेळी जमीन मोबादल्यासंदर्भात सरकारकडून अजून कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्याचवेळी भेटीचे नेमकं कारण सांगणं त्यांनी टाळलं.