निळ्या रंगाचे कुत्रे पाहिलेत का कधी?

तुम्ही आतापर्यंत काळे ,सफेद चॉकलेटी ,सोनेरी रंग असलेले कुत्रे बघितले असतील ,पण निळा रंगाचे श्वान कधी बघीतलेत का? पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक परिसरात तुम्हाला हे श्वान बघायला मिळतील.

Updated: Aug 12, 2017, 10:49 PM IST
निळ्या रंगाचे कुत्रे पाहिलेत का कधी?

तळोजा : तुम्ही आतापर्यंत काळे ,सफेद चॉकलेटी ,सोनेरी रंग असलेले कुत्रे बघितले असतील ,पण निळा रंगाचे श्वान कधी बघीतलेत का? पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक परिसरात तुम्हाला हे श्वान बघायला मिळतील.

तळोजा औद्योगिक वसाहती मधील प्रदूषणमुळे हे श्वान रंगीत झाले असल्याचा दावा करण्यात येतोय. तळोजा औद्योगिक वसाहती मधे अनेक केमिकल कंपन्या आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण ठिकाणी होत असत आणि याचा त्रास सामान्य नागरिक तसेच तेथील कामगाराना होत असतो. आता श्वानांना देखील येथील कंपन्यांनमुळे अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

या ठिकाणी अनेक ऑर्गेनिक कलर बनावणाऱ्या देखील कंपन्यां आहेत त्या कंपनीच्या परिसरात वावर करणाऱ्या श्वानांना येथे बनणारा कलर त्यांच्या शरीराला लागून या श्वांनांचा रंगच निळा झाला आहे. प्राणी मित्रांनी देखील ही गंभीर बाब असून या श्वानांवर लवकरात लवकर योग्य उपचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.