आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे. 

Updated: Mar 14, 2018, 09:16 AM IST
आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

मुंबई : विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे. 

या मुद्द्यावरून शिवसेना - भाजप यामध्येच आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. तर गेनबिटकोईन डॉट कॉमद्वारे आर्थिक फसवणूकीचा मुद्दा लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधानसभागृहात मांडण्यात येणार आहे. तर विधानपरिषदमध्ये औरंगाबाद कचरा प्रश्न, राज्यातील औद्योगिक कामगारांच्या समस्यां या विषयावरील अल्पकालीन चर्चा ठेवण्यात आली आहे. 

तर देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित अटक प्रकरण, नायर रुग्णालयातील MRI इथला रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू या प्रमुख मुद्द्यांवर लक्षवेधी प्रश्नाद्वारे चर्चा ठेवण्यात आली आहे.  तर राज्याची आर्थिक स्थिती, पर्यटन स्थळांच्या ठिकाणच्या सोईसुविधा, पुणे शहरांतील कचरा समस्यां यावरही चर्चा ठेवण्यात आली आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close