इकबाल कासकरनंतर डॉन डी के राव पोलिसांच्या जाळ्यात

इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी कुख्यात गुंडांना जाळ्यात घेण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. गुरूवारी मुंबई क्राईम ब्रॅंचने डॉन डी के राव याला ताब्यात घेतली आहे.

Updated: Oct 12, 2017, 05:06 PM IST
इकबाल कासकरनंतर डॉन डी के राव पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी कुख्यात गुंडांना जाळ्यात घेण्यासाठी मोहिम सुरू केली आहे. गुरूवारी मुंबई क्राईम ब्रॅंचने डॉन डी के राव याला ताब्यात घेतली आहे.

एका विश्वस्त सूत्रांनी नवभारत टाईम्सला ही माहिती दिली आहे. डी के राव हा याआधी दोनदा एनकाऊंटरमधून वाचला आहे. 

राव हा ब-याच वर्षांपासून डॉन छोटा राजनसोबत होता. मात्र गेल्या दोन दशकांपासून जास्तवेळ त्याने तुरुंगात घालवला आहे. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगाबाहेर आला होता. त्याचं खरं नाव रवि मल्लेश वोरा असे आहे. काही वर्षांपूर्वी लेडी सिंघम नावाने प्रसिद्ध पोलीस अधिकारी मदुला लाड यांच्यासोबत झालेल्या एका एनकाऊंटरमध्ये तो घायल झाला होता. तेव्हा त्याच्या खिशातून बॅंकेचे एक खोटे आयडी कार्ड मिळाले होते. त्यावर त्याचं नाव डी के राव लिहिलं होतं. तेव्हापासून त्याच नावाने त्याला ओळखलं जातं.

जेव्हा डी शिवानंदन मुंबई क्राईम ब्रॅन्चचे मुख्य होते. तेव्हा दादरमध्ये झालेल्या एका एनकाऊंटरमध्ये चार लोक मारले गेले होते. डी के राव त्यात जखमी झाला होता. छोटा राजनला दोन वर्षांपूर्वी डिपोर्ट केल्यानंतर त्याची मुंबईतील गॅंग जवळपास संपलीच आहे. त्यामुळे अजून हे स्पष्ट झालं नाही की, डी के राव स्वत:ची गॅंग चालवतोय की दुस-या कोणत्या गॅंगसोबत जुळला आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close