'बेस्ट' पुन्हा एकदा प्रवाशांसाठी धावून आली!

माटुंग्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा 'बेस्ट' बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. 

Shubhangi Palve Updated: Mar 20, 2018, 09:45 AM IST
'बेस्ट' पुन्हा एकदा प्रवाशांसाठी धावून आली! title=

मुंबई : माटुंग्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा 'बेस्ट' बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. 

आज रेल्वे मार्गावरचं आंदोलन, ओला - उबेरचं आंदोलन या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाकडून ज्यादा बसेसची सोय करण्यात आलीय. 

मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होता कामा नये यासाठी पश्चिम मार्गांवरील डेपोंमधूनही अधिक बसेस मागवण्यात आलीय, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिलीय. 

दरम्यान, अजूनही दादर-माटुंगा रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरूच आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक मात्र पुरतं कोलमडून गेलंय.