शेतकऱ्यांना १० हजाराच्या मदतीच्या योजनचा बोऱ्या वाजला

 पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या १० हजाराच्या रुपयांच्या मदतीच्या योजनचा पार बोऱ्या वाजला आहे. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत.

Updated: Jun 19, 2017, 11:54 AM IST
शेतकऱ्यांना १० हजाराच्या मदतीच्या योजनचा बोऱ्या वाजला

मुंबई : पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या १० हजाराच्या रुपयांच्या मदतीच्या योजनचा पार बोऱ्या वाजला आहे. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत.

अनेक ठिकाणी अद्याप सरकराचा जीआर पोहचलेलाच नाही. दरम्यान गोंधळामुळे १० हजाराची तातडीची मदत देण्याचा निर्णय अद्याप कागदावर राहिला आहे. सहकार मंत्रांनी जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर दररोज शेकडो फोन येत आहेत. शेतक-यांना उत्तर देताना विभागाच्या कर्मचा-यांची चांगलीच तारंबळ उडते आहे. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरिय बँकांच्या अधिका-यांची बैठक येत्या एक दोन दिवसात घेण्यात येईल. त्यातले निर्णय राज्यभरात पोहचायला आणखी आठवडा लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हाती प्रत्यक्ष पैसे पडयला २७ तारीख उजडण्याची शक्यता आहे.