सरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का?

कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेल्या लाँग मार्चची सरकारनं अखेर दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेतली. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 11, 2018, 04:18 PM IST
सरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का? title=

मुंबई : कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेल्या लाँग मार्चची सरकारनं अखेर दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेतली. 

यावेळी महाजनांनी शेतक-यांना सरकारच्या वतीने चर्चेचे निमंत्रण दिलं. शेतक-यांनी त्यांचा मोर्चा सोमय्या मैदानातच थांबवावा आणि सोमवारी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं आवाहन महाजनांनी शेतक-यांना केलं आहे. संबधित मंत्री आणि अधिका-यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल असंही महाजनांनी सांगितलंय. शेतक-यांच्या बहुतांशी मागण्या मान्य होतील अशी ग्वाहीसुद्धा महाजनांनी शेतक-यांना दिली.

पण सरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का?. शेतक-यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार का?. आंदोलक शेतकरी काय भूमिका घेणार ?. मोर्चा विधानभवनावर धडकणार की मोर्चा सोमय्या ग्राऊंडवर थांबणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाहा व्हिडिओ