संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, सणाचा उत्साह

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्राला सुरूवात झाली. 

Updated: Sep 21, 2017, 10:19 PM IST
संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, सणाचा उत्साह title=

मुंबई : भक्तीमय वातावरणात आज नवरात्राची घटस्थापना करण्यात आली. संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, उत्साहाचा सण सुरू झालाय. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्राला सुरूवात झाली. 

हजारो भाविकांनी आज दर्शनाचा लाभ घेतला. पुण्यात भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चतुःशुंगी देवीच्या देवळातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. तर पिंपरी चिंचवडमध्ये तुळजाभवानी मंदिरात उत्सवाला सुरूवात झालीय. देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.