जीएसटीनंतर अर्थमंत्री मुंबई पालिकेला देणार 700 कोटींचा चेक

जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. हा चेक मुनगंटीवार पालिका मुख्यालयात येऊन सूपूर्द करतील. 700 कोटींचा हा चेक असेल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानिमित्त भाजपकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यताय. जीएसटी लागु झाल्यानं जकात रद्द झाली आहे. 

Updated: Jul 4, 2017, 01:35 PM IST
जीएसटीनंतर अर्थमंत्री मुंबई पालिकेला देणार 700 कोटींचा चेक title=

मुंबई : जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. हा चेक मुनगंटीवार पालिका मुख्यालयात येऊन सूपूर्द करतील. 700 कोटींचा हा चेक असेल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानिमित्त भाजपकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यताय. जीएसटी लागु झाल्यानं जकात रद्द झाली आहे. 

जकातीतून पालिकेला सर्वाधिक महसूल मिऴत होता. दरवर्षी सात हजार कोटीहून अधिक उत्पन्न जकातीतून मिळत होतं. त्यात दरवर्षी पाच ते आठ टक्क्यांची वाढ होत होती. त्यामुळं जकात बंद झाल्यावर पालिकेला कायमस्वरुपी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.