मुकेश अंबानींच्या 'अॅन्टिलिया'ला आग

मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अॅन्टिलिया इमारतीला आग लागली आहे.

Updated: Jul 10, 2017, 09:57 PM IST
मुकेश अंबानींच्या 'अॅन्टिलिया'ला आग title=

मुंबई : मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अॅन्टिलिया इमारतीला आग लागली आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतल्या पेडर रोडवर मुकेश अंबानींचा बंगला अॅन्टिलिया आहे. अॅन्टिलिया इमारतीच्या नवव्या मजल्याला ही आग लागली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग आता आटोक्यात आली आहे.