मालडब्याला आग; पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली

आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला

Updated: Nov 9, 2018, 10:05 AM IST
मालडब्याला आग; पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली
प्रातिनिधिक फोटो

डहाणू : सुरत-मुंबई मालगाडीच्या दोन डब्यांना डहाणूजवळ आग लागल्यानं पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झालीय. या आगीचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबलेल्या दिसत आहेत. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. 

आग लागली त्या डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने ही आग झपाट्याने पसरत गेली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला. 

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीमुळे ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाल्याने डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close