काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आज मुंबईत

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज मुंबईत येत आहेत. उद्या एका खासगी कार्यक्रमात त्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे  त्या आज मुंबईत मुक्कामाला असणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 06:45 PM IST
काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आज मुंबईत title=

मुंबई : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज मुंबईत येत आहेत. उद्या एका खासगी कार्यक्रमात त्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे  त्या आज मुंबईत मुक्कामाला असणार आहेत. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आज संध्याकाळी सोनिया गांधी भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

राजीव शुक्ला, मिलिंद देवरा, सुशीलकुमार शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत उत्सुकता आहे.