बलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका

बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय. 

Updated: Aug 17, 2017, 10:36 PM IST
 बलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय. 

बलात्कार करण्यासाठी एका तरूणाने या तरूणीला मित्राच्या कारखान्यात नेलं. तिथे तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागला त्याचवेळी मुलीने धैर्याने त्याचा प्रतिकार करायला सुरूवात केली. 

कारखान्यात असलेलं ब्लेड या मुलीच्या हाती लागलं. त्या ब्लेडच्या सहाय्याने मुलीने तरूणाच्या गुप्तांगावर वार केले आणि स्वतःचा बचाव करून घेतला. आरोपी मुलावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केलीय.