मुंबईत तरुणीची छेड काढत धारदार शस्त्राने केले वार

मुंबईतील कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठक्कर बाप्पा परिसरात एका युवकाने युवतीची भर रस्त्यात छेडछाड करत केस ओढून मारहाण केली. इतकेच नाही तर तिच्यावर धारदार शस्त्राने नाकावर वार केला आहे.

Updated: Oct 20, 2017, 11:28 PM IST
मुंबईत तरुणीची छेड काढत धारदार शस्त्राने केले वार  title=

मुंबई : मुंबईतील कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठक्कर बाप्पा परिसरात एका युवकाने युवतीची भर रस्त्यात छेडछाड करत केस ओढून मारहाण केली. इतकेच नाही तर तिच्यावर धारदार शस्त्राने नाकावर वार केला आहे.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही सर्व घटना परिसरात असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुरक्षारक्षक आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली.

अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याच दिसते. पोलिसांनी इम्रानवर कडक कारवाई करण्याऐवजी साधा गुन्हा दाखल करून अटक केली.

आरोपीला न्यायालयात उभे केले असता त्याला जामिनही मिळाला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकचे कलम लावण्यात आले. तर, याप्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत.