म्हाडाची लॉटरी न लागलेल्यांना आनंदाची बातमी

हजारपेक्षा जास्त घरांचा समावेश असणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद वायकर यांनी केलीय. 

Updated: Nov 10, 2017, 03:57 PM IST
म्हाडाची लॉटरी न लागलेल्यांना आनंदाची बातमी

मुंबई : म्हाडाच्या सोडतीवेळी आज घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चाकरमान्यांना म्हाडाने दिलासा दिला आहे. म्हाडाची आगामी सोडत ही मे 2018 मध्ये होणार आहे. यामध्ये हजारपेक्षा जास्त घरांचा समावेश असणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद वायकर यांनी केलीय. 

५० हजार घरे तयार होतील-विनोद तावडे

तर गोरेगाव येथे पाच हजार घरांसाठी निविदा तयार होत असून पुढील दोन वर्षात ही घरे तयार होणार आहेत. त्याचप्रमाणे एमएमआरडीए एरियात काही वर्षात ५० हजार घरे तयार होतील, असे विनोद तावडे यांनी जाहीर केलं आहे. म्हाडा प्रशासनांची आज 899 घरांसाठी सोडत जाहीर झालीय. 

म्हाडाची आगामी सोडत ही मे 2018 मध्ये

८१९ सदनिकांसाठी ६५ हजार १२६ अर्जदार होते. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ८ सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता १९२ सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता एकूण २८१ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटाकरिता ३३८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close